मन्याड नदीच्या पाण्यात अडकलेला व्यक्ती सुखरूप बाहेर.
गणेश कदम
ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
बिलोली तालुक्यातील टाकळी व अटकळी परिसरात मन्याड नदीला आलेल्या पुरामुळे वझरगा येथील एक नागरिक पाण्यात फसला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. तत्काळ प्रशासनाने आणि गावकऱ्यांनी धाव घेतली. बिलोली नायब तहसीलदार मेटेवार साहेब, मंडळ अधिकारी मुंडकर मॅडम, ग्राम महसूल अधिकारी तलाठी अटकळी काळे मॅडम, आर आर अनमवार सहाय्यक महसूल अधिकारी, शेख युनूस महसूल सहायक, आशिष जनार्धन बोट ऑपरेटर महसूल, ललित पाटील तलाठी कुंडलवाडी, चव्हाण सर तलाठी आळंदी, मिलिंद सुपेकर आदमपूर तलाठी, घोंगडे सर तलाठी चीटमोगरा, काळेसाहेब बीट जमादार रामतीर्थ पोलीस स्टेशन, व अटकळी व टाकळी गावातील नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांतून त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये स्थानिकांचा सहभाग आणि प्रशासनाचे तत्पर काम हे कौतुकास्पद ठरल
दरम्यान, शासनाने जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठी जाऊ नका, तसेच धाडस करून पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
आपल्या सुरक्षिततेसाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सुरक्षित रहा, सतर्क रहा.
