दै. अधिकारांना/गणेश कदम.
अटकळी (ता. बिलोली) 25 आणि 26 जुलै रोजी अटकळी परिसरात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्यामुळे शेतीसाठी आवश्यक ती ओलावा निर्माण झाला असून, उभ्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे.
यंदा वेळेवर पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः सोयाबीन या मुख्य पिकाला भरपूर पाणी मिळाल्यामुळे त्यात भरघोस भर पडत असून, पिकांची वाढ जोमात सुरू आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, असेच हवामान राहिले तर यंदा चांगला उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून हलकासा पाऊस होत होता. मात्र, 25 आणि 26 तारखेला झालेल्या सततच्या पावसामुळे शेतीला मोठा फायदा झाला आहे. अटकळी शिवारात सध्या हिरवळ दिसत असून, निसर्गसौंदर्य खुलून आले आहे.
