*किशोर विद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी*
बिलोली प्रतीनीधी विलास शेरे
बिलोली तालुक्यातील अटकळी येथील किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली सकाळी ठिक 9.वाजता सर्व प्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक राजेश्वर आटकळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रतिमेचे पूजन केले. विद्यालयातील इंग्रजी शिक्षक श्री गंगाराम दोनतुलवाड सर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर सखोल अशी माहिती सांगितले यावेळी राजेंद्र मोरे, विजय कचवे अशोकराव विभुते संभाजीराव गव्हाणे, दत्तात्रेय सिंगणवाड ,राजेंद्र कुमार बैस, चंद्रकांत कनशेटे, साहेबराव तगेवार, सिद्धेश्वर उपलवार ,आदीमंडळी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
